बातम्या
हनुमान जयंतीनिमित्त भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांचे दर्शन व महाप्रसाद वाटप
By Administrator - 4/13/2025 2:34:14 PM
Share This News:
कोल्हापूर | हनुमान जयंतीनिमित्त भाजपचे प्रदेश सचिव मा. महेश बाळासाहेब जाधव यांनी बिंदू चौक येथील मारुती मंदिर, शिवाजी पेठेतील अवचितपीर तालीम आणि आयसोलेशन भागातील सयाजी आळवेकर यांच्या घरी जाऊन दर्शन घेतले. या ठिकाणी भक्तगणांसह दर्शन घेऊन महाप्रसाद वाटप करण्यात आला.
या प्रसंगी सयाजी आळवेकर, रामभाऊ फाळके, गिरीश शहा, गायत्री राऊत, विनायक साळुंखे, सतीश अंबर्डेकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात सर्वांनी हनुमान जयंती साजरी केली.
हनुमान जयंतीनिमित्त भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांचे दर्शन व महाप्रसाद वाटप
|