ताज्या बातम्या
अंबाबाई मंदिरात परिसरात स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाची उभारणी
By nisha patil - 9/25/2025 5:07:53 PM
Share This News:
कोल्हापूर दिनांक २५ साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. देशभरातून लाखो भाविक याकाळात मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मंदिर परिसरात महिलांना लहान मुलांना स्तनपान करण्याची अडचण होते हे ओळखून भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या पुढाकारातून युनिचार्म इंडिया कंपनीच्या सी.एस.आर फंडातून देणगी स्वरुपात अंबाबाई मंदिरासाठी दोन हिरकणी कक्ष राजवाडा पोलीस स्टेशन समोरील शेतकरी बझार याठिकाणी सुरु करण्यात आले आहेत.
आज या कक्षाचा लोकार्पण कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, देवस्थान सचिव शिवराज नायकवडी, व्यवस्थापक महादेव दिंडे, युनिचार्म इंडिया कंपनीचे अनिरुद्ध चौहान, डॉ शिशिर निरगुंडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले. या हिरकणी कक्षाच्या माध्यमातून मंदिरात येणाऱ्या स्तनदा मातांना त्यांच्या बालकांना स्तनपान करणे, डायपर बदलणे याकामी उपयोग होणार आहे. या उपक्रमाचे महिला वर्गातून कौतुक होत आहे.
सदर २ हिरकणी कक्षामध्ये एकाचवेळी ४ महिलांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. सदर केबिन अत्याधुनिक सुविधेने सज्ज असून यामध्ये २ सोपासेट, फॅन, एक्झोस फॅन, चार्जिंग पॉइंट यांची सुविधा आहे.
यावेळी कंपनीचे शुभम साहाय्य, सलभ पुरोहित यांच्यासह विराज चिखलीकर,राजू मोरे, अप्पा लाड, सचिन सुराणा, किरण कुलकर्णी, राकेश गुंदेशा उपस्तिथ होते.
अंबाबाई मंदिरात परिसरात स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाची उभारणी
|