खेळ
संसद खेल महोत्सवांतर्गत बुद्धिबळ स्पर्धेला उत्साहपूर्ण सुरुवात — भाजप प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या हस्ते शुभारंभ
By nisha patil - 3/11/2025 3:29:58 PM
Share This News:
संसद खेल महोत्सवांतर्गत बुद्धिबळ स्पर्धेला उत्साहपूर्ण सुरुवात — भाजप प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या हस्ते शुभारंभ
कोल्हापूर | संसद खेल महोत्सव अंतर्गत भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालयात बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव आणि महानगराध्यक्ष विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
या प्रसंगी सरचिटणीस विराज चिखलीकर, अमर साठे, हेमंत आराध्ये, विनय खोपडे, विशाल शिराळकर, गिरीश साळोखे, हेमंत कांदेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, स्पर्धक आणि नागरिक उपस्थित होते. स्पर्धेला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून विविध वयोगटातील स्पर्धक सहभागी झाले आहेत.
संसद खेल महोत्सवांतर्गत बुद्धिबळ स्पर्धेला उत्साहपूर्ण सुरुवात — भाजप प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या हस्ते शुभारंभ
|