बातम्या
बाप्पाच्या साक्षीने अन्याय निवारण समितीचा यथोचित सत्कार
By nisha patil - 8/9/2025 11:00:03 AM
Share This News:
बाप्पाच्या साक्षीने अन्याय निवारण समितीचा यथोचित सत्कार
आजरा (हसन तकीलदार):-आजपर्यंत आजरा अन्याय निवारण समितीने प्रत्येक गल्लीबोळातील,प्रत्येक वॉर्डातील आणि प्रत्येक कॉलनीतील मूलभूत प्रश्नांना वाचा फोडीत सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा व प्रश्नासाठी निरपेक्षपणे लढा दिलेला आहे. या सर्व कामांची दखल घेत तसेच समाजाभीमुख केलेल्या प्रश्नांचा निपटारा यासाठी सुभाष चौक गणेश मंडळातर्फे आजरा अन्याय निवारण समितीचा यथोचित सत्कार करण्यात आला.
आजरा अन्याय निवारण समितीचे कार्य सर्वश्रुत आहे. पाचपट वाढलेला घरफळा रद्द करणे, स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीवर नगरपंचायतीचा एक टक्का कर माफ करणे, रस्त्यावरील खड्डे, पाण्याचा प्रश्न, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, गटारी, कचरा उठाव, स्वछता असो अथवा पथदिव्यांचा प्रश्न... आजरा अन्याय निवारण समितीने धडक मोर्चे काढून, निवेदने देऊन प्रत्येक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम निरपेक्षपणे केले आहे.
नगरपंचायतमधील कामे वेळेत होत नसलेमुळे पुष्पहार घालण्याचा प्रयत्न करून अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी परवाचे केलेले अनोखे आंदोलन तर चर्चेचा विषय ठरला. अशा अनेकविध कार्याची दखल सुभाष चौक गणेश मंडळ, आजरा यांच्या वतीने घेत सार्वजनिक गणेश विसर्जानापूर्वी आरती व महाप्रसादाकारिता अन्याय निवारण समितीच्या पदाधिकारी व सदस्यांना निमंत्रित करण्यात आले.
याप्रसंगी समिती पदाधिकारी व सदस्यांचा सुभाष चौक गणेश मंडळातर्फे सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. तसेच समितीला आरतीचा मानही प्रदान करण्यात आला. नगरपंचयतीच्या निवडणूकीचा कालावधी संपून जवळपास दोन ते तीन वर्षे झाली. त्यामुळे याठिकाणी प्रभागाचे प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचे लोकप्रतिनिधच नसल्यामुळे नगपंचायतीमध्ये कामकाजाचा बोजावरा उडाला आहे.
त्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षापासून अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशराम बामणे (भाऊजी)यांच्या अध्यक्षतेखाली आजरा अन्याय निवारण समिती नगपंचायत हद्दीतील दुर्लक्षित मूलभूत सुविधा, नागरिकांच्या अडचणी तसेच समाजाभीमुख मागण्याबाबत सातत्याने आवाज उठवत असून लोकांच्या अडिअडचणी सोडवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नशील आहे.
याच कामांची दखल घेत सुभाषचौक गणेश मंडळाने समितीचा गौरव केला ही अभिनंदनीय बाब आहे. यामुळे अन्याय निवारण समितीला आणखीन बळ मिळाले असून सदस्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे तसेच यापुढेही असेच सामाजिक कार्यात अग्रेसर राहणार असल्याचे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशराम बामणे यांनी सांगितले.
यावेळी सचिन नलवडे (अध्यक्ष गणेश मंडळ), मनिष टोपले (उपाध्यक्ष), रोहित कारेकर व कपिल नलवडे (खजिनदार), राजू विभुते व म्हांतेश गुंजाटी (सचिव ), दिवाकर नलवडे, प्रशांत गजरे, संतोष कामत, पांडुरंग सावरतकर, दिनकर जाधव, जोतिबा आजगेकर, मदन तानवडे, वाय. बी. चव्हाण, बंडा चव्हाण, अगस्तीन नोरेंझो आदिजणासह गणेश मंडळाचे कार्यकर्ते व गणेश भक्त उपस्थित होते.
बाप्पाच्या साक्षीने अन्याय निवारण समितीचा यथोचित सत्कार
|