बातम्या

शेंदूरमध्ये जय भारत तरुण मंडळाकडून 60+ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान

jay bharat tarun mandal shendur honours senior activists


By Shivani - 9/19/2026 3:43:40 PM
Share This News:



शेंदूरमध्ये जय भारत तरुण मंडळाचा स्तुत्य उपक्रम; 60 वर्षांवरील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान

कागल प्रतिनिधी | अजित बोडके :

जय भारत तरुण मंडळ, शेंदूरच्या स्थापनेपासून मंडळाच्या सामाजिक आणि विविध उपक्रमांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या 60 वर्षांवरील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. हा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

मंडळाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच मंडळाच्या कार्यात योगदान देणाऱ्या दिवंगत कार्यकर्त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

हा विशेष सत्कार सोहळा श्री. जितेंद्र विष्णू शिरोळे व सौ. उषा जितेंद्र शिरोळे (श्री साई कापड व भांडी सेंटर) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व सत्कारमूर्तींना फेटा बांधून तसेच भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव करणाऱ्या या उपक्रमाचे गावातील ज्येष्ठ नागरिकांनी कौतुक केले. आपल्या कार्याची दखल घेत सन्मान केल्याबद्दल सत्कारमूर्तींनीही समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाला जय भारत तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मंडळाच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

 


शेंदूरमध्ये जय भारत तरुण मंडळाकडून 60+ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान
Total Views: 209