राजकीय

गोकुळ निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; कर्णसिंह गायकवाड जनसुराज्य शक्ती पक्षात

karnsingh gaikwad joins janasurajya shakti party before gokul election


By Shivani - 7/22/2026 4:26:50 PM
Share This News:



गोकुळ निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का; कर्णसिंह गायकवाड जनसुराज्य शक्ती पक्षात

कोल्हापूर : 

गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडीच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवलेले कर्णसिंह गायकवाड यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांच्या उपस्थितीत गायकवाड यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे. या निर्णयामुळे शाहूवाडी तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

कर्णसिंह गायकवाड हे शाहूवाडी मतदारसंघातील काँग्रेसचे प्रभावी नेते मानले जातात. त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली असून, स्थानिक राजकारणात त्यांचा मोठा जनसंपर्क आणि प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराचा परिणाम केवळ शाहूवाडीपुरता मर्यादित न राहता गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीवरही होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, गोकुळ दूध संघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशा जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांकडून कार्यकर्त्यांची आणिSenior Congress leader Karnsingh Gaikwad set to join Janasurajya Shakti Party in the presence of Vinay Kore ahead of the Gokul Dairy election in Kolhapur. नेत्यांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू असून, गायकवाड यांच्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. आता या पक्षांतराचा गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवर नेमका काय परिणाम होतो, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


kolhapu gokul dudh sangh election
Total Views: 14