राजकीय
E20 Petrol Controversy: कोल्हापुरात AAPचे आंदोलन; E20 पेट्रोलवरून सरकारवर गंभीर आरोप
By Shivani - 7/16/2026 3:10:19 PM
Share This News:
'इथेनॉल कंपन्यांसाठीच E20 ची सक्ती?' कोल्हापुरात AAPचा सरकारवर हल्लाबोल; दुचाकीची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
कोल्हापूर : E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात आम आदमी पक्षाने केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'इथेनॉल कंपन्यांच्या फायद्यासाठीच E20 पेट्रोलची सक्ती केली जात आहे का?' असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी सरकारच्या धोरणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
E20 पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात अनोखे आंदोलन केले. यावेळी दुचाकीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून E20 पेट्रोल धोरणाचा निषेध करण्यात आला.
आंदोलकांनी आरोप केला की, E20 पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होत असून इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसत असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी आंदोलकांनी केंद्रीय मंत्र्यांना लक्ष्य करत, "गाड्या खराब झाल्या तर जबाबदार कोण?" असा थेट सवाल केला. ग्राहकांच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने E20 पेट्रोलबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली.
आम आदमी पक्षाच्या म्हणण्यानुसार, E20 पेट्रोलबाबत जनतेच्या शंका दूर करण्यासाठी सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी आणि वाहनधारकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत
E20 Fuel Controversy | AAP Party
|