बातम्या

कोल्हापुरात दिनीयात ज्ञान परीक्षेला २ हजार विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

kolhapur diniyat dnyan pariksha 2000 students


By Administrator - 11/28/2026 4:17:20 PM
Share This News:



कोल्हापुरात दिनीयात ज्ञान परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५ केंद्रांवर २ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी

कोल्हापूर :

ईद फेस्टिव्हल, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिनीयात ज्ञान परीक्षेला शनिवारी (२८ नोव्हेंबर) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील पाच परीक्षा केंद्रांवर या परीक्षेला सुरुवात झाली असून, २ हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले आहेत.

कोल्हापूर शहरातील मुस्लिम बोर्डिंग येथील नेहरू हायस्कूल परीक्षा केंद्रावरही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत परीक्षेत सहभाग घेतला. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या दिनीयात विषयक ज्ञानाची चाचणी घेण्यात येत आहे.

परीक्षेच्या आयोजनासाठी ईद फेस्टिव्हलच्या दिनीयात ज्ञान परीक्षा आयोजन समितीने नियोजन केले आहे. परीक्षेला मिळालेला प्रतिसाद पाहता विविध परीक्षा केंद्रांवर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

दरम्यान, या परीक्षेचे वार्तांकन व छायाचित्रण करण्यासाठी पत्रकार आणि छायाचित्रकारांनी मुस्लिम बोर्डिंग येथील नेहरू हायस्कूल परीक्षा केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन ईद फेस्टिव्हलचे अध्यक्ष तथा परीक्षा आयोजन समितीचे अध्यक्ष श्री. गणी आजरेकर यांनी केले आहे.


कोल्हापुरात दिनीयात ज्ञान परीक्षेला २ हजार विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
Total Views: 15