ताज्या बातम्या

कोल्हापूरात 24 तासांत 1.1 मिमी पाऊस; 38 बंधारे पाण्याखाली, राधानगरीत 5.07 टीएमसी पाणीसाठा

kolhapur rain update 38 barrages submerged radhanagari dam water level


By Shivani - 10/7/2026 4:11:01 PM
Share This News:



कोल्हापूर :

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 1.1 मिमी पावसाची नोंद झाली असून गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 9 मिमी पाऊस झाला आहे. दरकोल्हापूर जिल्ह्यातील पावसामुळे पाण्याखाली गेलेले बंधारे आणि राधानगरी धरणातील पाणीसाठाम्यान, सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली गेले असून राधानगरी धरणात 5.07 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार हातकणंगलेमध्ये 0.3 मिमी, शिरोळमध्ये 0.1 मिमी, पन्हाळा 0.4 मिमी, शाहूवाडी 0.9 मिमी, राधानगरी 0.5 मिमी, गगनबावडा 9 मिमी, करवीर 0.3 मिमी, कागल 0.2 मिमी, गडहिंग्लज 0.3 मिमी, भुदरगड 0.2 मिमी, आजरा 0.7 मिमी आणि चंदगड 0.3 मिमी पावसाची नोंद झाली.

सकाळी 7 वाजेच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून कोणताही विसर्ग सुरू नसून धरणात 5.07 टीएमसी पाणीसाठा आहे.

पंचगंगा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, कासारी, भोगावती, तुळशी, कुंभी आणि ताम्रपर्णी नदीवरील मिळून 38 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये वारणा धरणात 20.18 टीएमसी, दूधगंगा 7.54 टीएमसी, तुळशी 1.93 टीएमसी, कासारी 1.54 टीएमसी, कडवी 1.39 टीएमसी, कुंभी 1.36 टीएमसी तसेच इतर धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे.

प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.


Kolhapur Rain Update
Total Views: 16