बातम्या
कोल्हापुरात १३ सप्टेंबरला वराह जयंतीचा भव्य उत्सव; मिरजकर तिकटीपासून मिरवणूक
By Shivani - 12/9/2026 5:52:20 PM
Share This News:
कोल्हापुरात १३ सप्टेंबरला वराह जयंतीचा भव्य उत्सव; मिरजकर तिकटीपासून मिरवणूक
कोल्हापूर :
भगवान विष्णूंचा तिसरा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान वराहदेवतेची जयंती यंदा १३ सप्टेंबर रोजी कोल्हापूर शहरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात येणार आहे. सकल हिंदू समाज, कोल्हापूर यांच्या वतीने यानिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
१३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता मिरजकर तिकटी येथून या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मिरवणुकीत सजविलेला वराहदेवतेचा रथ, आकर्षक धार्मिक देखावे, पारंपरिक वाद्यपथक, ढोल-ताशांचा गजर आणि भगवे ध्वज सहभागी होणार आहेत.
मिरजकर तिकटी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक
वराह जयंतीची मिरवणूक मिरजकर तिकटी – बिनखांबी गणेश मंदिर – महाद्वार रोड – पापाची तिकटी – छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने जाणार आहे.
भगवान वराहांनी हिरण्याक्ष राक्षसाचा वध करून पृथ्वीचे रक्षण केले, अशी पौराणिक मान्यता आहे. त्यामुळे वराह अवतार हा धर्म, पर्यावरण आणि पृथ्वीच्या रक्षणाचे प्रतीक मानला जातो. याच पार्श्वभूमीवर वराह जयंतीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या मिरवणुकीत परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भगवान वराहदेवतेचे दर्शन घ्यावे आणि उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन सकल हिंदू समाज, कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोल्हापुरात १३ सप्टेंबरला वराह जयंतीचा भव्य उत्सव; मिरजकर तिकटीपासून मिरवणूक
|