आरोग्य
कोवाडेत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हून अधिक रक्तदात्यांचे रक्तदान
By Shivani - 9/23/2026 10:45:20 AM
Share This News:
कोवाडेत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हून अधिक रक्तदात्यांचे रक्तदान
कागल प्रतिनिधी : अजित बोडके -
समर्थ कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कोवाडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सौरभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सागर सखाराम घोळसे, संतोष परशराम चिमणे, अमर शंकर नार्वेकर, सतीश दशरथ देवेकर, हार्दिक होडगे, प्रशांत बागडी, श्रीधर शेलार, अक्षय गुंजकर, प्रतीक रायकर, पिल्या बाटे, सर्वेश साठे, अर्जुन बागडी, पिल्या होडगे तसेच राष्ट्रवादीचे नेते भास्कर देसाई, गणपती हुंदळेकर आदी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांचा लक्षणीय सहभाग. मंदा बागडी, शुभांगी शिवगण आणि दिव्या नार्वेकर यांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला.
रक्तदान हे गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरते. त्यामुळे समर्थ कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. शिबिराला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आयोजकांकडून रक्तदाते आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानण्यात आले.
कोवाडेत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हून अधिक रक्तदात्यांचे रक्तदान
|