बातम्या

रीलसाठी साडी आणण्याकरिता आली सिमेंट मिक्सरच्या धडकेत जीव गमावली

lost her life in accident


By nisha patil - 8/16/2025 12:07:49 PM
Share This News:



रीलसाठी साडी आणण्याकरिता आली… सिमेंट मिक्सरच्या धडकेत जीव गमावली

कोल्हापूर :
वर्गमित्राच्या बाईकवरून इन्स्टाग्राम रीलसाठी साडी घेऊन जाताना सोन्या मारुती चौकातील भगतसिंग तरुण मंडळाजवळ इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा सिमेंट मिक्सरच्या धडकेत मृत्यू झाला.

मृत विद्यार्थिनीचे नाव श्रेया महेश देवळे (वय १९, मूळ गाव – उंब्रज, ता. कराड, जि. सातारा, सध्या रा. – साळोखेनगर, कळंबा रिंगरोड, कोल्हापूर) असे आहे. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला असून अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, श्रेया साळोखेनगरात मैत्रिणीसह शिक्षणानिमित्त राहत होती. बुधवारी दुपारी वर्गमित्र ओम संदीप पाटील (वय १९, रा. प्रथमेशनगर, कळंबा रिंगरोड, कोल्हापूर) याला रील बनवण्यासाठी साडी हवी असल्याचे श्रेयाने सांगितले.

ओम रात्री नऊच्या सुमारास श्रेयाला दुचाकीवर मागे बसवून गंगावेश येथे मामाच्या घरातून साडी आणण्यासाठी गेला. साडी घेऊन दोघे पुन्हा सोन्या मारुती चौकात आले.

रात्री साडेदहाच्या सुमारास सिमेंट मिक्सर ट्रकचालकाने दुचाकीला ओव्हरटेक करून पुढे अचानक डावीकडे वळ घेतले. त्यावेळी ट्रकच्या पाठीमागील डाव्या बाजूच्या चाकाने ओमच्या दुचाकीला धडक दिली.

धडक बसल्याने दुचाकी जमिनीवर पडली व ओम व मागे बसलेली श्रेया रस्त्यावर फेकले गेले. परिसरातील लोकांनी तात्काळ मदत करून दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना श्रेयाचा मृत्यू झाला.


रीलसाठी साडी आणण्याकरिता आली
Total Views: 94