बातम्या
सत्तेच्या मस्तीत’ वागणाऱ्यांवर कारवाईची मागणी...
By nisha patil - 7/24/2025 12:48:23 PM
Share This News:
सत्तेच्या मस्तीत’ वागणाऱ्यांवर कारवाईची मागणी...
शिवसेनेतर्फे माजलेल्या लोकप्रतिनिधींचा विरोध करण्यासाठी मूक निषेध
महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकृत आणि असंवेदनशील वर्तनामुळे राज्याच्या प्रतिमेला धक्का बसला असून, कोल्हापूर कोल्हापुरातील दसरा चौक येथे मुक निषेध व्यक्त करण्यात आला . शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण विष्णुपंत इंगवले यांनी हे आंदोलन उभं करत संताप व्यक्त केला आहे.
विधानसभेत रमी खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, वेटरला मारणारे संजय गायकवाड, सभागृहात बिनधास्त बोलणारे संजय शिरसाट, अंधश्रद्धा पसरवणारे भरत गोगावले, सभागृहात मारामारी करणारे गोपीचंद पडळकर आणि कोल्हापुरात शासनाच्या जागा गिळणारे राजेश क्षीरसागर यांच्यावर इंगवले यांनी टीका केली.
"सत्तेच्या मस्तीत वागत असलेल्या या प्रतिनिधींनी महाराष्ट्राच्या लोकशाही प्रतिष्ठेला धक्का दिला आहे. शिवसेना आणि कोल्हापूरची जनता अशा प्रवृत्तींना थारा देणार नाही," असे इंगवले यांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले, "सरकारने अशा लोकप्रतिनिधींवर कारवाई करावी, आणि जनता देखील त्यांचा निषेध करावा
सत्तेच्या मस्तीत’ वागणाऱ्यांवर कारवाईची मागणी...
|