मनोरंजन

कुशल बद्रिके अंकुश चौधरींचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजतोय

mamachya govyala jauya box office collection marathi movie 2026


By Shivani - 4/8/2026 5:16:00 PM
Share This News:



मराठी सिनेसृष्टीचा जलवा कायम! ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ ने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी

मुंबई :
यंदाचं वर्ष मराठी सिनेसृष्टीसाठी खास ठरत आहे. मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. ‘राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद 2’ यांसारख्या चित्रपटांनंतर आता आणखी एका मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडली आहे. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण आणि अंकुश चौधरी यांच्या दमदार अभिनयाने सजलेला ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. रिलीज झाल्यानंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत 2026 मधील चर्चेतील मराठी चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

मनोरंजन विश्वातील सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या काही दिवसांत चांगला प्रतिसाद मिळवला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ८ लाख रुपयांची कमाई केली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी कमाईत मोठी वाढ होत ७२ लाख रुपयांचे नेट कलेक्शन केले. तर ओपनिंग वीकेंडमध्ये चित्रपटाची कमाई ८४ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. या कामगिरीमुळे ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट 2026 मधील मराठी चित्रपटांच्या ओपनिंग वीकेंडमध्ये आघाडीवर असलेल्या चित्रपटांमध्ये दाखल झाला आहे.

टॉप मराठी ओपनिंग वीकेंड चित्रपटांच्या यादीत स्थान

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ ने ओपनिंग वीकेंड कलेक्शनमध्ये ‘राणापती शिवराय: स्वारी आग्रा’ या चित्रपटाला मागे टाकत टॉप ओपनर्सच्या यादीत स्थान मिळवल्याचे सांगितले जात आहे.

2026 मधील चर्चेतील मराठी चित्रपटांमध्ये:

राजा शिवाजी - 37 कोटी
देऊळ बंद 2 - 15.75 कोटी
तुंबडची मंजुळा - 3.25 कोटी
घबाडकुंड - 2.43 कोटी
क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम - 2.2 कोटी
अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई - 1.8 कोटी
भूतम भयम - 1.48 कोटी
मामाच्या गोव्याला जाऊया - 84 लाख (ओपनिंग वीकेंड)
विजू माने यांचे दिग्दर्शन; कलाकारांची तगडी फळी

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन विजू माने यांनी केले आहे. पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांनी लिहिले आहेत. चित्रपटात कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण आणि अंकुश चौधरी यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते. गोव्याच्या नयनरम्य ठिकाणी चित्रित करण्यात आलेला हा चित्रपट 31 जुलै 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.


Mamachya Govyala Jauya Box Office Collection
Total Views: 18