विशेष बातम्या
“कर्नाटकचा धडाकेबाज निर्णय – महिलांना मासिक पाळीची पगारी रजा!”
By nisha patil - 11/10/2025 11:52:18 AM
Share This News:
कर्नाटक राज्य सरकारने महिलांसाठी एक ऐतिहासिक आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे.
राज्यातील सरकारी कार्यालये, खाजगी कंपन्या आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांना आता दरमहा एक दिवसाची पगारी ‘मासिक पाळी रजा’ मिळणार आहे.
हा निर्णय १ जानेवारी २०२५ पासून राज्यभर लागू होणार असून, कामकाजाच्या ठिकाणी महिलांच्या आरोग्य आणि सोयीसाठी हा मोठा पाऊल मानला जात आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
महिला आणि बालविकास खात्याच्या अध्यक्षतेखालील अठरा जणांच्या समितीने सरकारला हे धोरण तयार करण्याची शिफारस केली होती. अखेर, त्या शिफारसीला आज मान्यता देण्यात आली.
या रजेच्या माध्यमातून महिलांना मासिक पाळीदरम्यान आवश्यक विश्रांती आणि आरोग्याची काळजी घेण्याची संधी मिळेल.
कर्नाटक हे धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याची शक्यता असून, या निर्णयाचं सर्व स्तरांवरून स्वागत होत आहे.
“कर्नाटकचा धडाकेबाज निर्णय – महिलांना मासिक पाळीची पगारी रजा!”
|