बातम्या
नवरसवाडीत स्वाभिमानी क्रांती स्पोर्ट्सचे रक्तदान शिबिर; गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी
By Shivani - 9/19/2026 3:49:46 PM
Share This News:
नवरसवाडीत स्वाभिमानी क्रांती स्पोर्ट्सच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
कागल प्रतिनिधी | अजित बोडके :
सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ चे औचित्य साधून स्वाभिमानी क्रांती स्पोर्ट्स, नवरसवाडी (पिंपळगल्ली) यांच्या वतीने शनिवार, १९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘रक्तदान करा, जीवनदान द्या!’ या संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थ, तरुण वर्ग आणि गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी जपणारा सण ठरावा, या उद्देशाने मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदान केले.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याचा मंडळाच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सामाजिक उपक्रमातून गणेशोत्सव साजरा करण्याच्या मंडळाच्या प्रयत्नाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
शिबिराच्या आयोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी स्वाभिमानी क्रांती स्पोर्ट्सच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
नवरसवाडीत स्वाभिमानी क्रांती स्पोर्ट्सचे रक्तदान शिबिर; गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी
|