राजकीय

जीएसटी दरकपात म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग – खासदार धनंजय महाडिक

new gst rate


By nisha patil - 9/22/2025 12:54:34 PM
Share This News:



 

कोल्हापूर :भारताच्या अमृतकाळात सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय वस्तू व सेवा कराच्या (GST) दररचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून दिलेला संकल्प आता प्रत्यक्षात उतरल्याचे सांगून, "जीएसटी दरकपात म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग आहे," असा विश्वास भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

खासदार महाडिक म्हणाले की, वस्तू आणि सेवा कराच्या रचनेत झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व सर्वांना लाभ देणारा बदल आहे. त्यामुळे व्यापार क्षेत्राला मोठा फायदा होईल, मागणी व उत्पादन वाढेल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. परिणामी कुटुंबांची आर्थिक प्रगती होऊन सर्वसामान्य माणसाचे जीवनमान सुखी होणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने हा निर्णय एकमताने घेतल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी, लघु व मध्यम उद्योग, महिला, युवक आणि मध्यमवर्गीयांना या नव्या कररचनेचा थेट फायदा होणार असल्याचा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला.

सध्याच्या चार स्तरीय कर रचनेचे सुसूत्रीकरण करून आता फक्त दोन दर – ५% आणि १८% ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा हलका किंवा नाहीसा झाला आहे.

नवीन जीएसटी दररचना (प्रमुख बदल)

लोणी, तूप, तेल – १२% वरून ५%

चीज – १२% वरून ५%

पनीर/छेना – ५% वरून शून्य

मासे व कैव्हियार (प्रिझर्व्ह केलेले) – १२% वरून ५%

कोळंबी व प्रॉन्स (प्रिझर्व्ह केलेले) – १२% वरून ५%

कन्फेक्शनरी – १८% वरून ५%

चॉकलेट व इतर खाद्यपदार्थ – १८% वरून ५%

पास्ता – १२% वरून ५%

पेस्ट्री, केक, बिस्कीट, ब्रेड – १८% वरून ५%


महाडिक म्हणाले, “मोदी सरकार केवळ विकासाचे राजकारण करत आहे. कोणत्याही राज्यात कोणाचेही सरकार असले तरी, या दरकपातीचा थेट फायदा प्रत्येक राज्यातील जनतेला, गरिबांना, मध्यमवर्गीयांना, तसेच छोट्या-मोठ्या उद्योग-व्यावसायिकांना मिळणार आहे.”


जीएसटी दरकपात म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग – खासदार धनंजय महाडिक
Total Views: 86