बातम्या
विवेकानंद कॉलेजच्या निशा ची आर्मी डे परेडसाठी निवड
By nisha patil - 1/14/2025 4:21:39 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजच्या निशा ची आर्मी डे परेडसाठी निवड
कोल्हापूर : दि.15 जानेवारी 2025 रोजी पुणे येथे होणा-या राष्ट्रीय पातळीवर सेना दिवस परेड एन.सी.सी टूपमध्ये विवेकानंद महाविद्यालयातील अंडर ऑफिसर निशा अमर बजागे, बी.ए.भाग 3 (होमसायन्स्) हिची निवड झाली आहे.
या निवडीबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य मा. अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी अभिनंदन केले.
वरील छात्रास 6 महाराष्ट्र बटालियनचे कर्नल संधान मिश्रा, मेजर सुनीता भोसले, लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा, प्रबंधक श्री. रघुनाथ जोग यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
विवेकानंद कॉलेजच्या निशा ची आर्मी डे परेडसाठी निवड
|