राजकीय
मा. खासदार निवेदिता माने यांची गोकुळ अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांना सदिच्छा भेट
By nisha patil - 5/31/2025 6:14:14 PM
Share This News:
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नुकतेच निवडून आलेले नाविद हसन मुश्रीफ यांना मा.खासदार निवेदिता माने यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या भेटीत त्यांनी नाविद मुश्रीफ यांच्या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत सांगितले की, "गोकुळ हा शेतकऱ्यांच्या श्रमाचा आणि विश्वासाचा अधिष्ठान आहे. नाविद मुश्रीफ यांनी ही परंपरा पुढे नेत संघाचा विकास साधावा, अशी अपेक्षा आहे."
गोकुळच्या अध्यक्षपदावर निवड होऊन नाविद मुश्रीफ यांनी वडील हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्याचा ओघ सुरु आहे.
मा. खासदार निवेदिता माने यांची गोकुळ अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांना सदिच्छा भे
|