ताज्या बातम्या
नागपूर येथील सुरु असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनास कॉ. शिवाजी गुरव यांचा पाठिंबा
By nisha patil - 12/12/2025 12:54:52 PM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- नागपूर येथे राज्य अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेषनाच्या दरम्यान पहिल्या दिवसापासून राज्यातील डी. एड. व बी. एड. धारक पात्र अभियोग्यताधारक शिक्षक भरती करण्यासाठी व त्या अनुषंगिक इतर मागण्यासाठी सुरु असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आरदाळ ता. आजरा येथील सामाजिक कार्यकर्ते कॉ. शिवाजी गुरव सोमवार दि. 15/12/2025 रोजी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यासाठी आजरा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यामध्ये समूहशाळा करण्याचा व शिक्षण महाग करून गोरगरिबांना शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव आहे याला जनतेचा विरोध आहे.तसेच नवीन शिक्षक पात्रता परीक्षा देऊनही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत मात्र त्यांना झुलवत ठेवले जात असल्याचा आरोप होत आहे. बरीच वर्षे शिक्षक भरतीच नसल्याने बरेच अभियोग्यताधारक शिक्षक होण्यासाठीची वयाची मर्यादा संपली आहे. अशा शिक्षक भरतीची वयोमर्यादा ओलांडलेल्या अभियोग्यताधारकांना सरकारकडून बेरोजगार भत्ता म्हणून अर्धा पगार देणेत यावा. कोणतीही शाळा बंद करू नये. प्रत्येक शाळेला शिक्षक मिळालाच पाहिजे.गाव तिथे शाळा आणि वर्ग तिथे शिक्षक मिळालाच पाहिजे. नको त्या ठिकाणी पैसा खर्च करण्यापेक्षा शिक्षण आणि आरोग्यावर पैसा खर्च करावा. तो पैसा कधीच वाया जात नाही. अभियोग्यतधारकांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी भावी शिक्षकांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी हे उपोषण करणार आहे असे निवेदनात म्हटले आहे. सदरचे निवेदनच्या आजरा तहसीलदार यांचबरोबरच मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री तसेच आजरा पोलीस्टेशनलाही प्रती देण्यात आल्या आहेत.
नागपूर येथील सुरु असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनास कॉ. शिवाजी गुरव यांचा पाठिंबा
|