ताज्या बातम्या
29 सप्टेंबर 2025 रोजी पन्हाळगडावर रस्ता रोको,
By nisha patil - 9/17/2025 11:03:07 AM
Share This News:
पन्हाळा:- (शहाबाज मुजावर) सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांच्या कडून मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये रस्ता तयार करण्यात आला होता.जो जो रस्ता केला आहे. वाघबीळ घाटापासून तो रस्ता खराब झाला आहे.
एकंदरीत रस्ता करण्याची काही आवश्यकता नसताना रस्ता केला गेला. हा रस्ता अत्यंत चांगल्या स्थितीत होता. मे 2025 च्या शेवटच्या आठवड्यात या रस्त्यावर त्या काळात खडी पसरली गेली, खडी व डांबराचे नियमानुसार योग्य मिश्रणाचे डांबरीकरण न केले गेल्यामुळे या वर्षी झालेल्या पहिल्या पावसातच तो रस्ता टिकू शकला नाही. ऐन पावसाळ्यात तो वाहून गेला. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
अनेक वेळा तोंडी अधिकाऱ्यांना सांगून अधिकाऱ्यांकडून कोणतीही काम झाल्या नसल्यामुळे नागरिक रस्ता रोको करणार आहेत. इथून पुढे वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
अनेक प्रसार माध्यमांनी याबाबत आवाज उठवला होता.तरी सुद्धा नुसता एक-दोन वेळा झाडू मारून या रस्त्यावर कर्मचारी गेले आहेत. एकंदरीत काही आवश्यकता नवीन रस्त्याची नसताना हा रस्ता कशासाठी केला. हाच मोठा प्रश्न नागरिकांमध्ये पडला आहे.
पन्हाळगड हे युनोस्को दर्जा भेटला आहे. तसेच गडावर तालुका असल्यामुळे वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. एखाद्या खाण उत्खनन परीसरात असावे. अशा पद्धतीचे सर्वत्र धुळीचे वातावरण झाले आहे.
पन्हाळगडावर सुरुवातीस भेट देणारे पर्यटक, स्थानिक नागरिक ,आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. लहान मुलांचे श्वासनासंबंधीच्या आजारांना समोरा जावे लागत आहे. प्रवासी कर नाक्यापासून बाजीप्रभू चौक यांच्या प्रत्येक घरात रस्त्यावरही धूळ उडून स्थानिक लोकांचे संपूर्ण घर धुळीने माखले आहे. पंचकोशीतील येणारे तालुका रहिवासी या खराब रस्त्यामुळे उडणारा धुळी मुळे त्रस्त झाले आहेत.
लहान मोठे,अपघात घडत आहेत.सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून या रस्त्याची दुरुस्ती बाबत येत्या सात दिवसात समाधानकारक उत्तर न मिळाल्यास 29 सप्टेंबर 2025 रोजी, अकरा वाजता पन्हाळा चार दरवाजा येते रस्ता रोको करण्यात येईल,असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर 150 ते 200 लोकांच्या सह्या आहेत.
29 सप्टेंबर 2025 रोजी पन्हाळगडावर रस्ता रोको,
|