शैक्षणिक

हेल्थकेअर व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील संधींवर विशेष मार्गदर्शन

pcb career opportunities seminar dy patil kolhapur kadamwadi


By nisha patil - 1/7/2026 10:58:52 AM
Share This News:



कोल्हापूर : 

१२ वी सायन्स (PCB) विद्यार्थ्यांसाठी हेल्थकेअर आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील करिअर संधींवर मार्गदर्शन करण्यासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्यावतीने विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.हा मार्गदर्शनपर सेमिनार रविवार, दिनांक ५ जुलै रोजी सकाळी कदमवाडी येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये होणार आहे. विद्यार्थ्यांना योग्य करिअर दिशा देणे आणि विविध शैक्षणिक पर्यायांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या आधुनिक युगात आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी हा सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. या सेमिनारमध्ये फार्मसी, फिजिओथेरपी आणि नर्सिंग यांसारख्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, देश-विदेशातील नोकरीच्या संधी आणि हेल्थकेअर क्षेत्रातील इतर करिअर पर्यायांवरही तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

याशिवाय हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम आणि त्यातील करिअर संधींची माहितीही विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. इंटरडिसिप्लिनरी क्षेत्रातील वाढत्या संधींबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना आणि पालकांना मेडिकल कॉलेज कॅम्पस, हॉस्पिटल, प्रयोगशाळा तसेच विविध शैक्षणिक सुविधा प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना करिअर निवड अधिक सुलभ होईल. विद्यार्थ्यांच्या मनातील शंका, संभ्रम आणि प्रश्नांचे निरसन थेट तज्ज्ञांशी संवाद साधून केले जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी या सेमिनारला उपस्थित राहावे, असे आवाहन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


१२ वी PCB करिअर मार्गदर्शन सेमिनार कोल्हापूर
Total Views: 14