विशेष बातम्या
प्रिन्स शिवाजी शाळा आमदार क्षीरसागर यांनी घेतली दत्तक; १० लाखांचा निधी जाहीर
By nisha patil - 6/16/2025 3:27:29 PM
Share This News:
प्रिन्स शिवाजी शाळा आमदार क्षीरसागर यांनी घेतली दत्तक; १० लाखांचा निधी जाहीर
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते जाधववाडीतील प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर येथे "शाळा प्रवेशोत्सव" अंतर्गत पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे गुलाबफूल देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार क्षीरसागर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी १० लाखांचा आमदार निधी जाहीर करत शाळेला दत्तक घेण्याचे जाहीर केले. या निधीतून शाळेसाठी मैदानाची सुरक्षा भिंत, नवीन खोल्या, संरक्षक कठडा, तसेच खेळाच्या मैदानाचे विकासकामे केली जाणार आहेत.
ते म्हणाले की, "राज्य सरकार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध असून, महानगरपालिका व जिल्हा परिषद शाळांमध्येही आता गुणवत्तेचे चित्र दिसून येत आहे." यासोबतच प्रशासनाने विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करू नये, पोषण आहाराची गुणवत्ता, स्वच्छता, औषध फवारणी आणि आरोग्य शिबिरे नियमित घ्यावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
कार्यक्रमास माजी नगरसेवक राजसिंह शेळके, अमर क्षीरसागर, मुख्याध्यापक नितीन चौगुले, शाळा विश्वस्त, शिक्षकवर्ग आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कविता सरदेसाई आणि आभार सौ. गवळी यांनी मानले.
प्रिन्स शिवाजी शाळा आमदार क्षीरसागर यांनी घेतली दत्तक; १० लाखांचा निधी जाहीर
|