राजकीय

पुणे पदवीधर निवडणूक २०२६ : सुनील मोदींच्या प्रचारासाठी आजऱ्यात अरुण दूधवडकरांचे मार्गदर्शन

pune graduate election 2026 sunil modi ajra shivsena


By Shivani - 10/23/2026 12:39:25 PM
Share This News:



पुणे पदवीधर निवडणूक २०२६ : सुनील मोदींच्या प्रचारासाठी आजऱ्यात शिवसैनिकांना अरुण दूधवडकरांचे मार्गदर्शन

आजरा प्रतिनिधी ।हसन तकीलदार

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकृत उमेदवार सुनील जबरचंद मोदी यांच्या प्रचारार्थ आजरा येथे शिवसैनिकांची बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

या बैठकीत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची भूमिका आणि प्रचाराची दिशा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उमेदवार सुनील मोदी यांच्या प्रचारासाठी शिवसैनिकांनी सक्रियपणे काम करण्याच्या दृष्टीने यावेळी चर्चा झाली.

बैठकीचे स्वागत आजरा तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी केले. यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजरा येथे झालेल्या या बैठकीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रचाराला गती देण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.


पुणे पदवीधर निवडणूक २०२६ : सुनील मोदींच्या प्रचारासाठी आजऱ्यात अरुण दूधवडकरांचे मार्गदर्शन
Total Views: 96