बातम्या
आजऱ्यात मूर्तिकार गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात व्यस्त
By nisha patil - 8/26/2025 3:10:09 PM
Share This News:
आजऱ्यात मूर्तिकार गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात व्यस्त
महागाईमुळे शाडूच्या मूर्तींचे दर वाढले; मूर्तिकारांची शासनाकडे मागणी
गणेशोत्सवाला अवघा एक दिवस बाकी असताना आजऱ्यातील मूर्तिकार गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यात व्यस्त झाले आहेत. मात्र रंग, कच्चा माल आणि वाहतूक खर्च वाढल्याने शाडूच्या मूर्तींचे दर वाढले आहेत.
शाडू मातीच्या मूर्ती सुकवण्यासाठी यंदा पावसामुळे मोठा अडथळा निर्माण झाला. मे १७ पासून सुरु असलेल्या पावसामुळे मूर्ती वेळेवर सुकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली, असे मूर्तिकार लक्ष्मण कुंभार यांनी सांगितले.
पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय सांभाळताना कुटुंबाचे सहकार्य लाभत असून दरवर्षी दीडशे मूर्ती तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र शाडू माती काढण्यास परवानगी नसल्याने खाजगी माती विकत आणावी लागते. शासनाने शाडू माती उपलब्ध करून देणे, मोठे कार्यशाळा दालन व बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
आजऱ्यात मूर्तिकार गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात व्यस्त
|