राजकीय
मध्यरात्री आम. राजेश क्षीरसागर यांची अचानक रस्त्याच्या कामाची पाहणी..
By nisha patil - 10/13/2025 11:39:48 AM
Share This News:
कोल्हापूर:- कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाची आमदार राजेश क्षीरसागर यांनी मध्यरात्री अचानक पाहणी केली. दसरा चौक ते स्वयंभू गणेश मंदिर मार्गावरील काम तपासताना अधिकारी व ठेकेदार अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. यावर आमदार क्षीरसागर यांनी फोनवरून संबंधितांना खडे बोल सुनावले.
त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, रस्त्यांच्या कामात कोणतीही हयगय चालणार नाही आणि दर्जेदार काम होणे अनिवार्य आहे. या अचानक भेटीची सकाळपासून शहरात जोरदार चर्चा असून नागरिकांनी आमदारांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.
मध्यरात्री आम. राजेश क्षीरसागर यांची अचानक रस्त्याच्या कामाची पाहणी..
|