राजकीय
आ. राजेश क्षीरसागर यांच्याकडून पूरनियंत्रण प्रकल्पाचे स्वागत; कोल्हापूरला मोठा दिलासा
By Administrator - 11/24/2026 3:24:41 PM
Share This News:
कोल्हापूरच्या पूरनियंत्रणासाठी ३,२०० कोटींचा प्रकल्प सुरू; आ. राजेश क्षीरसागर यांनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार
कोल्हापूर :
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराच्या संकटातून दिलासा देण्यासाठी ३,२०० कोटी रुपयांच्या पूरनियंत्रण प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होत आहे. या प्रकल्पामुळे पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासह दुष्काळी भागाला पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
२०१९ आणि २०२१ मधील महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांचे सुमारे १० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. अतिरिक्त पावसाचे सुमारे ८० टीएमसी पाणी धाराशिवकडे वळविण्याचे नियोजन असून, या प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुमारे १० हजार कोटी रुपयांचा असणार आहे.
तसेच, कोल्हापूर शहरातील जय नाला, गोमती नाला आणि दुधाळी नाल्यासह सुमारे १८ किलोमीटर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, काँक्रिटीकरण तसेच वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, स्केटिंग ट्रॅक आणि विरंगुळा केंद्र उभारण्याचे नियोजन आहे.
या कामांमुळे शाहूपुरी, राजहंस परिसर आणि शहरातील विविध उपनगरांमधील पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चालना दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे मनःपूर्वक आभार मानले.
आ. राजेश क्षीरसागर यांच्याकडून पूरनियंत्रण प्रकल्पाचे स्वागत; कोल्हापूरला मोठा दिलासा
|