राजकीय

🗳️ अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षणाविषयी निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन

reservation for Scheduled Tribe women


By nisha patil - 10/13/2025 1:14:20 PM
Share This News:



   अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या जागांपैकी महिलांचे आरक्षण कसे ठरवायचे, याबाबत अनेक जिल्ह्यांनी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवले होते. या संदर्भात आयोगाने 7 ऑक्टोबर 2025 रोजी पत्राद्वारे मार्गदर्शन जारी केले आहे.

या मार्गदर्शनानुसार – जर कोणत्याही प्रवर्गासाठी (SC/ST/OBC) फक्त एकच जागा असेल, तर महिला आरक्षणाचे नियोजन मागील निवडणुकीच्या आधारे करण्यात येईल. मागील निवडणुकीत त्या प्रवर्गातील जागा महिलेसाठी आरक्षित होती, तर या निवडणुकीत ती जागा महिलेसाठी आरक्षित राहणार नाही. मागील निवडणुकीत ती जागा महिलेसाठी आरक्षित नव्हती, तर या निवडणुकीत ती जागा महिलेसाठी आरक्षित करण्यात येईल.

त्याचप्रमाणे, जर एखाद्या प्रवर्गासाठी (SC/ST/OBC) प्रथमच एकच जागा राखीव होत असेल, तर ती जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात येईल. या नियमानुसार, 25 नांदणी विभागातील अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेले पद — मागील निवडणुकीत महिलेसाठी आरक्षित नव्हते. त्यामुळे या निवडणुकीत ते पद अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे.


अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षणाविषयी निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन
Total Views: 52