मनोरंजन
सचिन पिळगावकरांच्या ‘त्या’ एका डायलॉगने वाढवली उत्सुकता; २५ वर्षांनी मधुराणी प्रभुलकरांसोबत ‘कापूसकोंडा’त पुनरागमन
By Shivani - 8/29/2026 4:18:12 PM
Share This News:
‘कापूसकोंडा’चा टीझर पाहून सचिन पिळगावकरांच्या ‘त्या’ डायलॉगची चर्चा; मधुराणी प्रभुलकरांसोबत २५ वर्षांनी पुन्हा स्क्रीन शेअर
मुंबई :
मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर पुन्हा एकदा एका हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘नवरा माझा नवसाचा 2’नंतर आता सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ‘कापूसकोंडा’ या आगामी मराठी चित्रपटातून एकत्र दिसणार आहेत. विशेष म्हणजे, तब्बल २५ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार असल्याने चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘कापूसकोंडा’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शित झाल्यापासून या टीझरची चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, टीझरच्या शेवटी सचिन पिळगावकर बोललेला एकच डायलॉग सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
‘कापूसकोंडा’चा टीझर नेमका काय सांगतो?
‘कापूसकोंडा’ हा चित्रपट माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंध आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मनोरंजक प्रसंगांवर आधारित असल्याची झलक टीझरमधून मिळते.
टीझरची सुरुवात एका आवाजाने होते. “कापूस कोंड्याची गोष्ट ऐकली का हो? आता ऐकू नका, बघाच...” असा आवाज ऐकू येतो. त्यानंतर मधुराणी प्रभुलकर झोपेतून खडबडून जागी झालेली दिसते. तिच्यासोबत असलेल्या मुलीही उठतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव पाहायला मिळतात.
यानंतर एका स्वयंपाकघरातील दृश्यात सचिन पिळगावकर खुर्चीवर ‘हँड्सअप’ अवस्थेत बसलेले दिसतात. त्यांच्या मांडीवर एक कुत्राही असल्याचे पाहायला मिळते. टीझरच्या अखेरीस सचिन पिळगावकरांचा एक डायलॉग ऐकायला मिळतो आणि याच डायलॉगने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
२५ वर्षांनंतर सचिन-मधुराणी पुन्हा एकत्र
सचिन पिळगावकर आणि मधुराणी प्रभुलकर यांनी यापूर्वी एकत्र काम केले आहे. आता अनेक वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. त्यामुळे ‘कापूसकोंडा’ हा चित्रपट त्यांच्या चाहत्यांसाठी विशेष ठरणार आहे.
या चित्रपटात सचिन पिळगावकर आणि मधुराणी प्रभुलकर यांच्यासोबत मधुराया आणि गोखले, अक्षता पाडगावकर, जानवी तांबट आणि भूषण पाटील अशी कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे.
लातूर जिल्ह्यातील अंधारी गावात शूटिंग
‘कापूसकोंडा’चे चित्रीकरण लातूर जिल्ह्यातील अंधारी गावात करण्यात आले आहे. ग्रामीण पार्श्वभूमी आणि माणूस-प्राणी यांच्यातील नात्याची वेगळी गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात येणार असल्याची झलक टीझरमधून मिळते.
कोण आहे ‘कापूसकोंडा’चा दिग्दर्शक?
‘कापूसकोंडा’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांनी केले आहे. संवादलेखन आणि पटकथा सचिन मोहिते, गणेश पंडित आणि ऋषिकेश तुरई यांनी केली आहे. चित्रपटाचे छायांकन सचिन पाटेकर यांनी केले आहे.
चित्रपटातील गाण्यांना अवधूत गुप्ते आणि पद्मनाभ गायकवाड यांचा आवाज लाभला आहे. सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे.
पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, व्हीपी माऊली ग्रुप ऑफ कंपनीज आणि सॉरी वाला फिल्म यांच्या सहकार्याने हा चित्रपट सादर करण्यात येत आहे. जास्वंद एंटरटेनमेंट प्रा. लि.ने ‘कापूसकोंडा’ची निर्मिती केली आहे.
‘कापूसकोंडा’ कधी होणार रिलीज?
सचिन पिळगावकर आणि मधुराणी प्रभुलकर यांची पुन्हा एकदा पडद्यावरची जोडी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यातच टीझरमधील सचिन पिळगावकरांच्या त्या एका डायलॉगने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
‘कापूसकोंडा’ हा चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Kapus Konda Teaser: सचिन पिळगावकरांच्या ‘त्या’ डायलॉगची चर्चा
|