शैक्षणिक

शहाजी महाविद्यालयात कारगिल विजय दिन संपन्न 

shahaji college kolhapur


By Administrator - 7/28/2025 12:44:15 PM
Share This News:



शहाजी महाविद्यालयात कारगिल विजय दिन संपन्न 

कोल्हापूर - दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात एनसीसी विभागातर्फे २६ जुलै कारगिल विजय दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

यामध्ये ' कारगिल युद्धातील शौर्य' या विषयावर एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन उमेश वागदरे यांनी कारगिल युद्धाचा इतिहास सविस्तर विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्या शौर्यगाथामध्ये वीरमरण प्राप्त सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली त्याचबरोबर देशसवेची भावना निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना कारगिल युद्धाची व शौर्याची जाणीव व्हावी यासाठी डॉक्युमेंटरी फिल्म दाखवण्यात आले. 
 

ह्या स्तुत उपक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. मानसिंग बोंद्रे दादा तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवान यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर, सह समन्वयक डॉ ए. बी. बलुगडे, डॉ. डी. के. वळवी, अधीक्षक  मनीष भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन कॅप्टन डॉ. प्रशांत पाटील व प्रा. प्रशांत मोटे यांनी केले.


शहाजी महाविद्यालयात कारगिल विजय दिन संपन्न 
Total Views: 51