व्यवसाय

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात; सभासदांना 11 टक्के लाभांश

shahu chhatrapati shikshan sanstha patsanstha 11 takke labhansh


By Shivani - 3/9/2026 4:38:43 PM
Share This News:



श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात; सभासदांना 11 टक्के लाभांशाची घोषणा

कोल्हापूर :

दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. या सभेत पतसंस्थेच्या सभासदांना 11 टक्के लाभांश देण्याची घोषणा चेअरमन विठ्ठल आंबले यांनी केली.

सभेच्या निमित्ताने सेवानिवृत्त सभासद, गुणवंत विद्यार्थी तसेच विशेष शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल आंबले, संस्थेचे अधीक्षक व पतसंस्थेचे संचालक  मनीष भोसले यांच्या हस्ते सत्कार सोहळा पार पडला.

सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये श्रावणी कांबळे, सई पाटील, अनुराग भोसले, यश कांबळे आणि प्रांजल मांडणीकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच विशेष शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त सभासद  रंगराव कांबळे आणि सरदार पाटील यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पतसंस्थेला 19 लाखांहून अधिक नफा

संस्थेचे चेअरमन मानसिंग दादा बोंद्रे यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे संस्था प्रगतीपथावर असल्याचे चेअरमन विठ्ठल आंबले यांनी सांगितले. यंदा पतसंस्थेला 19 लाख रुपयांहून अधिक नफा झाल्याची माहिती त्यांनी दिली.

सभेतील विषयांचे वाचन सेक्रेटरी पांडुरंग भंडारी यांनी केले. सभासदांनी सभेपुढे ठेवण्यात आलेल्या सर्व विषयांना मंजुरी दिली.

यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, संचालक मनीष भोसले, डॉ. दीपक कुमार वळवी, डॉ. अनिल बलगुडे, अजित पाटील, पंढरीनाथ पाटील, डॉ. पांडुरंग पाटील, शिवाजी पाटील, अशोक हराळे, रंगराव कांबळे, मनीषा पाटील, डॉ. नीता काशिद पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन प्रसाद धावरे यांनी केले, तर डॉ. पांडुरंग पाटील यांनी आभार मानले.


Kolhapur News: शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या पतसंस्थेकडून 11 टक्के लाभांशाची घोषणा
Total Views: 25