बातम्या

श्रीराम सेतूच्या जतनाची मागणी; दर्शनी निंबाळकर म्हणाल्या, ‘हा अस्मितेचा विषय’

shriram setu preservation national heritage demand darshani nimbalkar kagal


By Shivani - 9/25/2026 5:11:13 PM
Share This News:



श्रीराम सेतूच्या जतनाची मागणी; ‘अस्मितेचा विषय’ असल्याचे दर्शनी निंबाळकर यांचे मत

कागल प्रतिनिधी - अजित बोडके

कागल तालुक्यातील सांगाव येथील खुळे गल्ली परिसरातील रहिवासी दर्शनी संतोष निंबाळकर यांनी श्रीराम सेतूचे जतन व संवर्धन करण्याची मागणी केली आहे. श्रीराम सेतू हा केवळ दगडांचा सेतू नसून कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा आणि भारतीय संस्कृतीचा महत्त्वपूर्ण प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रामायण काळाशी संबंधित मानला जाणारा श्रीराम सेतू हा ऐतिहासिक वारसा असून, त्याचे पुढील पिढ्यांसाठी जतन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे निंबाळकर यांनी सांगितले.

श्रीराम सेतूला राष्ट्रीय धरोहर म्हणून घोषित करून त्याचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व जपावे, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “राम सेतू आपल्या इतिहासाची साक्ष आहे. त्याकडे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे, तर ऐतिहासिक ठेवा म्हणूनही पाहिले पाहिजे.”

श्रीराम सेतूच्या संवर्धनासाठी जनजागृती होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या भूमिकेला सांगाव परिसरातील ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला आहे.


श्रीराम सेतूच्या जतनाची मागणी; दर्शनी निंबाळकर म्हणाल्या, ‘हा अस्मितेचा विषय’
Total Views: 87