ताज्या बातम्या

सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचे रात्रभर प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

soybean procurement center


By nisha patil - 11/12/2025 12:56:21 PM
Share This News:



गडहिंग्लज:-  सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सरचिटणीस राजेंद्र गड्यान्नावर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीत रात्रभर प्रांत कार्यालयासमोर ठाण मांडून आंदोलन केले.

मागील दोन महिन्यांपासून गडहिंग्लज तालुक्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शासनाकडे सातत्याने होत आहे. मात्र शासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

एका महिन्यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी खरेदी केंद्र सुरू झाल्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात प्रशासनाने आजपर्यंत कोणतेही पाऊल उचललेले नाही, अशी टीका शेतकरी करत आहेत.

खरेदी केंद्र न सुरू झाल्याने शेतकऱ्यांची बिकट अवस्था निर्माण झाली असून हमीभावापेक्षा प्रति क्विंटल 1000 ते 1200 रुपयांनी कमी दराने सोयाबीन विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्ग अधिक आक्रमक होत असून मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचे रात्रभर प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
Total Views: 27