राजकीय

जलमापक मीटर व  पाणीपट्टी वाढीस शेतकऱ्यांचा विरोध जलसंपत्ती प्राधिकरणाकडे हरकती सादर

submit objections to Water Resources Authority


By nisha patil - 5/29/2026 5:28:02 PM
Share This News:



जलमापक मीटर व  पाणीपट्टी वाढीस शेतकऱ्यांचा विरोध जलसंपत्ती प्राधिकरणाकडे हरकती सादर

 
महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानकडुन सन 2026 ते 2029 सालाकरिता ठोक जलप्रशुल्क वाढवणे व जलमापक यंत्र बसवून शेतकऱ्यांना मोजून पाणी देण्याच्या प्रस्तावावर हरकती मागविण्यात आल्या होत्या . त्याबाबत आंदोलन अंकुश संघटने कडून आज सांगली पाटबंधारे विभागास भेट देऊन चर्चा करण्यात आली . तसेच वरील गोष्टी विरोध करत प्राधिकरणाकडे लेखी हरकत सुद्धा घेण्यात आली. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे नदी प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे आपल्याकडील कृष्णा ,पंचगंगा, वारणा, दुधगंगा या नद्या प्रदूषित पाण्याच्या धोका पातळी पुढे गेलेल्या आहेत .त्यामुळे हे प्रदूषित पाणी शेतीला देऊन शेतीचा पोत खराब होत आहे. त्यामुळे उलट पक्षी शेतीला प्रदूषित पाणी दिल्याबद्दल शेतकऱ्यांना  अनुदान देणे गरजेचे आहे. प्रदूषित पाण्यामुळे पिकांचे उत्पादन घटले आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे उत्पादित केलेल्या शेतीमालाला गेली दहा वर्षात अजिबात भाव मिळालेला नाही. त्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात गेला आहे.


त्यातच सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यामध्ये दरवर्षी जलसंपदा विभागाच्या  पाण्याच्या योग्य नियोजना अभावी महापूर येतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच उपसा सिंचन  विद्युत मोटारींचे नुकसान होत. त्या ठिकाणी प्रॅक्टिकली जलमापक यंत्र बसवणे अशक्य आहे.


यामुळे आधीच तोट्यात शेती करणाऱ्या शेतकऱ्याला जलमापक मीटरचे सक्ती करून पाणी मोजून मापून देण व पाणीपट्टी आकारणीमध्ये वाढ करणे शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे. या सर्व गोष्टींचा  विचार करून शासनाने शेतकऱ्यांच्या वैयक्तिक व पाणीपुरवठा संस्थांच्या उपसासिंचनास पाणीपट्टी वाढ व जलमापक मीटरची सक्ती करू नये . या उपर शेतकऱ्यांचा विरोध डावलून जर शासनाने तसा निर्णय घेतला तर  शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा देण्यात आला. 


यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, रावसाहेब ऐतवडे ,अमोल गावडे,  उदय पाटील, महादेव काळे इत्यादींनी सहभाग नोंदविला.


जलमापक मीटर व  पाणीपट्टी वाढीस शेतकऱ्यांचा विरोध जलसंपत्ती प्राधिकरणाकडे हरकती सादर
Total Views: 7