राजकीय

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

sunetra ajit pawar condolence visit dy patil family kolhapur


By Shivani - 9/8/2026 11:26:54 AM
Share This News:



उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

कोल्हापूर :

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी सुनेत्रा अजित पवार यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत दुःखात सहभागी असल्याचे सांगितले.

या सांत्वनपर भेटीवेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात केलेले योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह कोल्हापूरच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.


उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबीयांना सांत्वनपर भेट
Total Views: 25