शैक्षणिक

शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर; कोल्हापुरात आचारसंहिता लागू

teacher graduate constituency election 2026 model code of conduct kolhapur


By Shivani - 9/22/2026 5:59:27 PM
Share This News:



शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे बिगुल; कोल्हापुरात आदर्श आचारसंहिता लागू

कोल्हापूर :

शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने मंगळवारी (२२ सप्टेंबर) जाहीर केला. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच पुणे विभागातील संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर असून, अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर आहे.

२३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

आचारसंहितेच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.


शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर; कोल्हापुरात आचारसंहिता लागू
Total Views: 14