राजकीय
जागावाटपावरून राष्ट्रवादीचा काँग्रेसला अल्टिमेटम १७ जागांचा प्रस्ताव देऊनही निर्णय नाही; राष्ट्रवादीचा ‘होय की नाही’ सवाल
By nisha patil - 12/26/2025 11:51:06 AM
Share This News:
महाविकास आघाडीत जागावाटपाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस यांच्यातील तणाव तीव्र झाला आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसला गुरुवारी एक दिवसाचा अल्टिमेटम दिला असून, चर्चा सुरू न झाल्यास अन्य पक्षांसोबत जाण्याचा पर्याय खुला असल्याचा थेट इशारा दिला आहे.
१७ जागांचा प्रस्ताव सादर करूनही काँग्रेसकडून किती जागा दिल्या जाणार याबाबत कोणतीही स्पष्टता न मिळाल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज आहेत. जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी पत्रकार परिषदेत ‘होय किंवा नाही’ असा ठोस निर्णय गुरुवारी रात्रीपर्यंत देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, तिसरी आघाडी उभारण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्याशी संपर्क साधल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जागावाटपावरून राष्ट्रवादीचा काँग्रेसला अल्टिमेटम १७ जागांचा प्रस्ताव देऊनही निर्णय नाही; राष्ट्रवादीचा ‘होय की नाही’ सवाल
|