बातम्या
जिल्ह्यात ‘टेक-वारी’ प्रशिक्षणाचे प्रसारण सर्व शासकीय कार्यालयांतून
By nisha patil - 6/5/2025 5:22:39 PM
Share This News:
जिल्ह्यात ‘टेक-वारी’ प्रशिक्षणाचे प्रसारण सर्व शासकीय कार्यालयांतून
अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा– जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
माहिती व तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी महाराष्ट्र शासनाने ‘टेक-वारी – टेक लर्निंग वीक’ या प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. मंत्रालयापासून तालुकास्तरापर्यंत ऑनलाईन पद्धतीने हे प्रशिक्षण दिले जात असून, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात याचे थेट प्रक्षेपण झाले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तांत्रिक ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. AI, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा, तणाव व्यवस्थापन, ध्यानधारणा यांसारख्या विषयांचा समावेश प्रशिक्षणात आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. पहिल्या दिवशी प्रख्यात वक्ते गौर गोपाल दास यांनी ‘प्रभावी व तणावमुक्त जीवन’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचे सत्र ‘टेक-वारी’च्या यूट्यूब व फेसबुक पेजवर थेट पाहता येणार आहेत.
जिल्ह्यात ‘टेक-वारी’ प्रशिक्षणाचे प्रसारण सर्व शासकीय कार्यालयांतून
|