आरोग्य

व्हन्नाळी येथे चावडी गल्ली गणेश मित्र मंडळाचे रक्तदान शिबिर; ५० हून अधिक रक्तदान

vannali chavdi galli ganesh mitra mandal blood donation camp


By Shivani - 9/23/2026 12:09:12 PM
Share This News:



व्हन्नाळी येथे चावडी गल्ली गणेश मित्र मंडळाचे भव्य रक्तदान शिबिर; ५० हून अधिक युवकांचे रक्तदान

कागल प्रतिनिधी : अजित बोडके

गणेशोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत व्हन्नाळी येथील चावडी गल्ली गणेश मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

मंडळाचे अध्यक्ष अभिजीत माळी आणि उपाध्यक्ष वैभव वाडकर यांच्या नेतृत्वाखाली या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्यातून सामाजिक उपक्रमांना चालना मिळावी, या उद्देशाने मंडळाकडून दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात.

यंदा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन मंडळाने रक्तदान शिबिर आयोजित केले. या उपक्रमात परिसरातील युवकांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, एका रक्तदात्यामुळे गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते, असा संदेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक उपक्रमातून समाजोपयोगी कार्य करण्याचा मंडळाचा प्रयत्न असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


व्हन्नाळी येथे चावडी गल्ली गणेश मित्र मंडळाचे रक्तदान शिबिर; ५० हून अधिक रक्तदान
Total Views: 44