मनोरंजन
विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; स्वातंत्र्यदिन सोहळ्यातील VIDEO व्हायरल
By Shivani - 8/15/2026 2:10:41 PM
Share This News:
तृषा कृष्णन विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत दिसली; स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यातील VIDEO व्हायरल
चेन्नई :
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय आणि अभिनेत्री तृषा कृष्णन यांच्या नात्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सुरू आहे. दोघांकडूनही या चर्चांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. अशातच आता चेन्नईतील फोर्ट सेंट जॉर्ज येथे झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये अभिनेत्री तृषा कृष्णन या विजय थलपती यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर आणि आई शोभा चंद्रशेखर यांच्यासोबत बसलेल्या दिसत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा विजय आणि तृषा यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.
तृषाचा खास लूक चर्चेत
स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी तृषा कृष्णनने पिवळी साडी आणि हिरवा ब्लाऊज परिधान केला होता. केसांचा अंबाडा बांधून त्यावर गजरा माळलेला तिचा पारंपरिक लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओमध्ये तृषा आनंदी आणि उत्साही दिसत असून ती विजय यांच्या आई-वडिलांसोबत बसलेली पाहायला मिळते.
विजय-तृषाच्या नात्याची पुन्हा चर्चा
विजय थलपती आणि तृषा कृष्णन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. गेल्या काही काळापासून त्यांच्या वैयक्तिक नात्याबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा होत आहेत. तृषा यापूर्वी विजय यांच्या मुख्यमंत्री म्हणून झालेल्या शपथविधी सोहळ्यातही उपस्थित असल्याचे समोर आले होते.
दरम्यान, विजय यांच्या पत्नी संगीता यांनी घटस्फोटासंदर्भातील अर्ज मागे घेतल्याच्या चर्चाही अलीकडे रंगल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाला आणखी वेग आला. मात्र, या वैयक्तिक बाबींवर संबंधितांकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.
व्हिडीओमुळे नेटकऱ्यांचे प्रश्न
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातील तृषा कृष्णन आणि विजय यांच्या आई-वडिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी विविध प्रश्न उपस्थित करत आहेत. तृषा विजय यांच्या कुटुंबासोबत बसलेली दिसल्याने त्यांच्या नात्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
तृषा कृष्णन विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत दिसली; VIDEO व्हायरल
|