शैक्षणिक

विवेक वाहिनी म्हणजे विवेकी व्यक्तिमत्त्व घडवणारे व्यासपीठ : स्वाती कृष्णात

vivek vahini inauguration swati krishnat kolhapur


By Shivani - 3/9/2026 4:52:52 PM
Share This News:



विवेक वाहिनी म्हणजे विवेकी व्यक्तिमत्त्व घडवणारे व्यासपीठ; स्वाती कृष्णात यांचे प्रतिपादन

कोल्हापूर:

विद्यार्थ्यांच्या कौशल्याला योग्य दिशा देऊन त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे आणि विवेकी व्यक्तिमत्त्व निर्माण करणारे प्रभावी व्यासपीठ म्हणजे विवेक वाहिनी होय, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस) कोल्हापूर शाखेच्या शहर कार्याध्यक्ष स्वाती कृष्णात यांनी केले.

त्या विवेकानंद कॉलेजमधील आयक्यूएसी विभागातर्फे आयोजित विवेक वाहिनी उद्घाटन कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील होते.

स्वाती कृष्णात म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या विचारांना योग्य दिशा देऊन सुसंस्कृत आणि सजग समाज घडवणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान समजून घेत त्यामधील हक्क आणि कर्तव्यांचे पालन केले पाहिजे. तसेच समाजातील भ्रष्टाचार, लिंगभेद, अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता यांसारख्या गंभीर समस्यांच्या निराकरणासाठी विद्यार्थ्यांनी सक्रियपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक वाहिनी समन्वयक डॉ. सरिता शिंदे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सदस्य डॉ. कविता तिवडे यांनी करून दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले, तर सदस्य प्रा. मयुरी पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.


विवेक वाहिनी उद्घाटन; विद्यार्थ्यांनी विवेकनिष्ठ समाज घडवावा : स्वाती कृष्णात
Total Views: 15