शैक्षणिक

‘ब्लुम टेक्सोनॉमी’ पध्दतीने प्रश्नपत्रिका तयार करण्याचे प्रशिक्षण – डॉ. उत्तम जाधव यांचे मार्गदर्शन

vivekanand college 1


By nisha patil - 10/13/2025 5:38:11 PM
Share This News:



‘ब्लुम टेक्सोनॉमी’ पध्दतीने प्रश्नपत्रिका तयार करण्याचे प्रशिक्षण – डॉ. उत्तम जाधव यांचे मार्गदर्शन

कोल्हापूर, दि. १३ : विवेकानंद कॉलेजच्या परीक्षा विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रश्नपत्रिका तयार करण्याची मुख्य संकल्पना आणि मार्गदर्शन’ या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.

मुख्य अतिथी म्हणून डॉ. उत्तम जाधव (डिन, स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स, डायरेक्टर – सेंटर ऑफ ॲडव्हान्स लर्निंग अँड टीचिंग, संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे) यांनी ब्लुम टेक्सोनॉमी पध्दतीने प्रश्नपत्रिका तयार करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी menti.com च्या माध्यमातून प्रश्नांची पातळी, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि नमुना प्रश्नपत्रिका तयार करण्याचे प्रात्यक्षिक दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार होते. त्यांनी परीक्षेला महाविद्यालयाचा आत्मा संबोधत, प्रश्नपत्रिकांमध्ये नवनवीन संकल्पना वापरण्याची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जी. जे. नवाथे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. माधुरी पवार यांनी केले तर आभार डॉ. सुप्रिया पाटील यांनी मानले. शिबिरास प्राध्यापकवर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


‘ब्लुम टेक्सोनॉमी’ पध्दतीने प्रश्नपत्रिका तयार करण्याचे प्रशिक्षण – डॉ. उत्तम जाधव यांचे मार्गदर्शन
Total Views: 86