शैक्षणिक

विवेकानंद महाविद्यालयात ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

vivekanand college kolhapur avishkar research competition 2026 27


By Shivani - 1/10/2026 1:14:08 PM
Share This News:



विवेकानंद महाविद्यालयात ‘आविष्कार संशोधन स्पर्धा २०२६-२७’; विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ

कोल्हापूर :

विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर (अधिकारप्रदत्त स्वायत्त संस्था) येथे आविष्कार समिती आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयस्तरीय ‘आविष्कार संशोधन स्पर्धा २०२६-२७’ उत्साहात पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती विकसित होणे गरजेचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचा समाजाला प्रत्यक्ष उपयोग झाला पाहिजे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना सादर कराव्यात आणि महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.

स्पर्धेच्या संयोजिका डॉ. अस्मिता तपासे-शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वरिष्ठ महाविद्यालयातील पदवी (UG), पदव्युत्तर (PG) आणि पदव्युत्तर पश्चात (PPG) विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनातील नाविन्यपूर्ण कल्पना पोस्टर तसेच प्रभावी प्रात्यक्षिक मॉडेलच्या माध्यमातून सादर केल्या.

सहा विभागांत स्पर्धा

‘आविष्कार संशोधन स्पर्धा २०२६-२७’ सहा प्रमुख गटांमध्ये घेण्यात आली.

  1. मानव्यविद्या, भाषा व ललित कला
  2. वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा
  3. शुद्ध विज्ञान
  4. कृषी व पशुसंवर्धन
  5. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
  6. औषधनिर्माण व वैद्यकशास्त्र

या विविध गटांमध्ये महाविद्यालयातील विविध विभागांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपल्या संशोधन संकल्पना आणि नाविन्यपूर्ण प्रयोग सादर केले.

कार्यक्रमास प्रभारी प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, डॉ. ई. बी. आळवेकर, रजिस्ट्रार एस. के. धनवडे, विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सिद्धिका इनामदार यांनी केले, तर आभार प्रा. अमेय पाटील यांनी मानले.


विवेकानंद महाविद्यालयात ‘आविष्कार संशोधन स्पर्धा २०२६-२७’ उत्साहात
Total Views: 14