शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘नशामुक्त युवा–विकसित भारत’ अभियान; विद्यार्थ्यांनी घेतला व्यसनमुक्तीचा संकल्प
By Shivani - 9/30/2026 4:56:45 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘नशामुक्त युवा–विकसित भारत’ अभियान; विद्यार्थ्यांनी घेतला व्यसनमुक्तीचा संकल्प
कोल्हापूर :
विवेकानंद ज्युनियर कॉलेज, कोल्हापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘नशामुक्त युवा–विकसित भारत’ या शासकीय उपक्रमांतर्गत नशामुक्ती व स्वाक्षरी अभियान उत्साहात पार पडले. सशक्त, निरोगी आणि व्यसनमुक्त तरुण पिढी घडवून देशाच्या विकासाला गती देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पाटील आणि प्रा. एच. जी. पाटील यांनी अभियानाचे संयोजन केले. यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगत नशामुक्त समाज निर्मितीसाठी युवकांची भूमिका अधोरेखित करण्यात आली.
स्वाक्षरीद्वारे नशामुक्त राष्ट्राचा संकल्प
व्यसनाविरोधातील लढ्याला पाठिंबा देण्यासाठी महाविद्यालयात विशेष स्वाक्षरी फलक तयार करण्यात आला होता. या फलकावर प्राचार्य, प्राध्यापक, स्वयंसेवक आणि स्वयंसेविकांनी स्वाक्षरी करून नशामुक्त राष्ट्र निर्मितीचा संकल्प केला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी प्रशासकीय सेवा उत्कृष्टरीत्या पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल श्री. सदानंद दुर्गुळे यांचा NSS विभागाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रभारी प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, डॉ. संदीप पाटील, डॉ. पी. एस. बागडे, डॉ. बी. टी. दांगट, पी. वाय. राठोड, डॉ. एच. पी. पाटील, एम. पी. गवळी, ए. पी. पाटील, एस. एन. माने, पी. यू. पाटील, सत्कारमूर्ती सदानंद दुर्गुळे यांच्यासह शिक्षक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी केले. प्रा. एच. जी. पाटील यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांनी नशामुक्तीचा संकल्प घेतल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘नशामुक्त युवा–विकसित भारत’ अभियान; विद्यार्थ्यांनी घेतला व्यसनमुक्तीचा संकल्प
|