शैक्षणिक

जिद्द आणि चिकाटीची धरता कास.संकटे येवोत कितीही.. यश मिळेल हमखास

you will definitely get success


By nisha patil - 9/15/2025 11:33:09 AM
Share This News:



आजरा (हसन तकीलदार):- आजरा तालुक्यातील एका लहानशा खेड्यातील म्हणजे गवसे येथील विशाल शिवाजी नवार याने आपल्या अंधत्वावर मात करीत आय. बी.पी. एस. परीक्षा उत्तीर्ण होऊन बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये क्लार्क पदावर झेप घेऊन धडधाकट युवकांना जिद्दीचा धडा दिला आहे.

आपल्या कमजोरीवर मात करीत शासकीय बँकेत धडक मारणे एव्हढे सोपे नव्हते. तरीसुद्धा विशाल नवारने यशाला गवसणी घालून आजच्या युवकांना जिद्दीचा आणि यशाचा मार्ग दाखवला आहे.
   फक्त जिद्द ठेवा...!आयुष्याची सुरवात कधीही आणि कोठूनही होऊ शकते. मन ध्येयवेडं असेल तर अंगात बळही भरता येतं. जिद्दीच्या जोरावरच तर यश सदैव हसू लागतं. लढणं समजून घेतलं तर आकाशही ठेंगणं वाटतं. नेमकं हेच गवसे येथील विशाल नवारने दाखवून दिले आहे. विशाल हा पूर्वीपासून अंध नव्हता फक्त रातआंधळेपणा होता. परंतु काही दिवसांनी त्याला दिसणं बंद झाले. अगदी मनमिळावू आणि आज्ञाधारक. घरची परिस्थितीही बेताचीच. जमीन नाही, शेतीवाडी नाही.

गावात फक्त दीड दोन गुंठे जागा. वडील वारणानगरला हॉटेलमध्ये कामाला. विशालची शिकण्याची इच्छा मात्र तिव्र. कोल्हापूर येथे प्राथमिक आणि माध्यमिक अंधशाळेत शिक्षण झाले. डोळ्यांची व्याधी असताना सुद्धा त्याच्या शिकण्याच्या तिव्र इच्छेला घरातल्यांनी कधीच विरोध केला नाही. त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. अशा परिस्थितीतसुद्धा विशालला मुंबई सारख्या शहरात शिकवलं. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून यश संपादन केले. महत्वाची आणि अभिमानाची बाब म्हणजे विशालची नेमणूक गवसे येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेतच झाली आहे.

मुंबईच्या दादर येथील कीर्ती कॉलेज मधून विशालने पदवी संपादन केली आहे. आई मोल मजुरी करते. तर एक भाऊ खाजगी कंपनीत नोकरी करतो. गावातील एका तरुणाने यातून युवकांना आदर्श घालून दिला आहे. याबद्दल आमच्या गावचा तरुण म्हणून विशाल बद्दल अभिमान आहे असे हॉटेल घरचा दरबारचे मालक युवा उद्योजक अविनाश हेब्बाळकर यांनी सांगितले.
            रात नहीं ख्वाब बदलता है,
            मंजिल नहीं कारवां बदलता  
            है.
             जज्बा रखो जितने का 
               क्यूँकी,
             किस्मत बदले न बदले,
             पर वक्त जरूर बदलता है!


जिद्द आणि चिकाटीची धरता कास.. संकटे येवोत कितीही.. यश मिळेल हमखास
Total Views: 67