शैक्षणिक
हे मेडिकल कॉलेज नाही, इंजिनियरिंग कॉलेजही नाही… ही आहे जिल्हा परिषदेची शाळा!
By nisha patil - 9/15/2025 12:20:35 PM
Share This News:
अहिल्यानगर:- सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे एक उद्योगपती पुढे सरसावले आहेत. PRM Soft Solution या सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ राजेंद्र शिंदे यांनी त्यांच्या CSR फंडातून व स्वतःच्या खर्चातून तब्बल ५ कोटी रुपये खर्च करून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा भव्य व सुसज्ज इमारत बांधून दिली आहे.
ही शाळा पाहिल्यावर कोणालाही वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयाची आठवण होईल, इतकी आकर्षक आणि आधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत. शाळेत प्रवेश करताच आधुनिक बेंचेस, डिजिटल क्लासरूम, वाचनालय, तसेच संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही यांसारख्या सर्व सुविधा विद्यार्थ्यांसाठी देण्यात आल्या आहेत.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरातील शाळांच्या तोडीस तोड सुविधा मिळणार असून पालक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गावासाठी उभारलेला हा आदर्श उपक्रम समाजातील इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
हे मेडिकल कॉलेज नाही, इंजिनियरिंग कॉलेजही नाही… ही आहे जिल्हा परिषदेची शाळा!
|