बातम्या

नाम. प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून मोफत कृत्रिम अवयव वाटप कार्यक्रम संपन्न*

Prakash abitkar 2


By nisha patil - 10/7/2026 11:30:19 PM
Share This News:



**नाम. प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून मोफत कृत्रिम अवयव वाटप कार्यक्रम संपन्न**

**गरजू दिव्यांगानी घेतला लाभ*

**आजरा(हसन तकीलदार)*:-नाम. प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून दिव्यांग बांधवांना सक्षम करण्यासाठी मोफत कृत्रिम अवयव व पोलिओ कॅलिपर्स वाटपाचा कर्यक्रम दि. 10/07/2026 रोजी आजरा हायस्कुलच्या अण्णा भाऊ सांस्कृतिक हॉल मध्ये संपन्न झाला. दिव्यांग तपासणी करून जाग्यावरच कृत्रिम अवयवांचे ऑन दि स्पॉट म्हणजेच जाग्यावरच कृत्रिम अवयवांचे मोफत मोफत वाटप करण्याचे शिबीर संपन्न झाले.

    दिव्यांगाना आपल्या अशा आकांक्षाची झेप घेता यावी, त्यांनाही चालता फिरता यावे, त्यांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलावे, तेही आनंदाने जगावे याच संकल्पनेतून नाम. प्रकाश आबिटकर (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके पालक मंत्री )यांनी दिव्यांगाना मोफत कृत्रिम अवयव वाटपाचे शिबीर आयोजित केले होते. यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, कृत्रिम अवयवांचे जाग्यावरच वाटप, पोलिओ कॅलिपर्स उपलब्ध तसेच पूर्णतः मोफत सेवा अशी शिबिराची वैशिष्ट्ये होती.

     यावेळी ऍलींको एस.आर. ट्रस्ट इंदोरचे डॉ. संकेत डेखणकर यांच्यासह त्यांचे सहकारी यांनी गरजू दिव्यांगसाठी जाग्यावर कृत्रिम अवयव तयार केले. गटविकास अधिकारी सुभाष सावंत, आरोग्य अधिकारी रवींद्र गुरव यांनी मार्गदर्शन केले तर इंद्रजित देसाई, रणजित सरदेसाई यांनी उपक्रमाची माहिती दिली. यापुढे नामदार प्रकाश अबिटकर साहेब यांच्या उपस्थितीत अशाच पद्धतीच्या भव्य कार्यक्रमाच्या नियोजनाचे संकल्प असल्याचे विजय थोरवत (शहर प्रमुख)यांनी सांगितले.

   यावेळी राजेंद्र सावंत(उपजिल्हाप्रमुख ), महेश खेडेकर, धनंजय पाटील, शरीफभाई खेडेकर, अनिल डोंगरे, महेश दळवी,दयानंद निउंगरे, अभिजित रांगणेकर आदिजण उपस्थित होते.

राजू पोतनीस यांनी आभार मानले.

 

**नामदार आबिटकर यांनी आपल्या संकल्पनेतून साकार केलेल्या या कार्यक्रमामुळे ज्या लाभार्थीना लाभ मिळाला त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य व समाधान म्हणजेच नामदार आबिटकर यांच्या कार्याची पोहचपावती म्हटले तर वावगे ठरणार नाही. यावेळी बोलताना दिव्यांग लाभार्थी अनंत आप्पा मगदूम(नींगुडगे)आणि मारुती धोंडिबा दळवी (सिरसंगी) नामदार आबिटकर यांच्या कार्याची प्रशंशा करताना भावुक झाले*


नाम. प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून मोफत कृत्रिम अवयव वाटप कार्यक्रम संपन्न*
Total Views: 135