बातम्या
शिंदे सेना गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचेवर कारवाई करा-कॉ.संपत देसाई**
By nisha patil - 10/7/2026 11:26:23 PM
Share This News:
**शिंदे सेना गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचेवर कारवाई करा-कॉ.संपत देसाई**
**आजरा तहसीलदार यांना दिले निवेदन*
**आजरा(हसन तकीलदार)*:-शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे याने डॉक्टर व परिचारक(आरोग्यकर्मचारी)यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेध करीत म्हात्रे याच्यावर कडक कारवाई करणेबाबत आजरा तहसीलदार यांना निवेदन देणेत आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शास्त्रीनगर येथील रुग्णालयात शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे व त्याच्या कार्यकर्त्यांनी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना लज्जास्पदशिवीगाळ व मारहाण केली आहे. ही बाब अत्यंत निंदनीय व निषेधार्ह असून त्याच्यावर व त्याच्या सहकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी.
या घटनेमुळे डॉक्टर, परिचारक यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात अनेक घटना घडलेल्या आहेत त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करणे अवघड झाले आहे. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री यांनी आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना आखल्या पाहिजेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना होणारी मारहाण रोखण्यासाठी असे गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र घोषित करून कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारा कायदा आणण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात प्रयत्न करावेत व वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी संरक्षण द्यावे अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर कॉ. संपत देसाई, कॉ. शांताराम पाटील, रवींद्र भाटले, अंबाजी सुतार, मऱ्याप्पा बोलके, प्रकाश मोरस्कर, बाबुराव सावंत आदींच्या सह्या आहेत.
शिंदे सेना गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचेवर कारवाई करा-कॉ.संपत देसाई**
|