राजकीय
सरकारला आरसा दाखवणे महाराष्ट्रद्रोह नाही कायदा सुव्यवस्थेवर सरकारला घेराव
By Shivani - 10/7/2026 3:02:12 PM
Share This News:
कोल्हापूर :
महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी, महिला सुरक्षेचा प्रश्न, पोलीस यंत्रणेतील रिक्त पदे आणि विकास प्रकल्पांमधील पारदर्शकतेच्या अभावावरून काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आ. सतेज (बंटी) पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होत आ. सतेज पाटील यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
"सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही. विरोधी पक्षाचे कर्तव्य म्हणजे जनतेचे प्रश्न मांडणे आणि सरकारच्या चुका निदर्शनास आणून देणे," असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका करणाऱ्यांना महाराष्ट्रद्रोही ठरवण्याच्या प्रवृत्तीवर निशाणा साधला.
लोकशाही व्यवस्थेत सरकारवर प्रश्न उपस्थित करणे हा विरोधी पक्षाचा घटनात्मक अधिकार असल्याचे सांगत, जनतेच्या हितासाठी केलेली टीका सरकारने सकारात्मकपणे स्वीकारावी आणि त्यातून सुधारणा कराव्यात, असे आवाहनही आ. पाटील यांनी केले.
राज्यातील वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, पोलीस यंत्रणेतील समस्या आणि प्रशासनातील त्रुटींवर सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
Satej Patil Attack On Maharashtra Government
|